मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi: जयच्या टीमने आदिश वैद्यला केलं टार्गेट! उत्कर्षने म्हटलं 'कॉमेडी'तर गायत्रीने केली त्याच्या चालण्याची नक्कल
Bigg Boss Marathi: जयच्या टीमने आदिश वैद्यला केलं टार्गेट! उत्कर्षने म्हटलं 'कॉमेडी'तर गायत्रीने केली त्याच्या चालण्याची नक्कल
बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पुर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची दिमाखदार सुरुवात झाली आहे. दररोज शोमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. तसेच बिग बॉसचा तिसरा पर्व हा स्पर्धकांसाठी सर्प्राइजेसचा पिटारा आहे असं म्हटलं आहे. त्यानुसार स्पर्धकांना नवनवीन सरप्राईज मिळत आहेत.
2/ 7
बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पुर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे.
3/ 7
दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. काल जय आणि आदेशमध्ये खूप मोठा राडा झाला. आदिश घरामध्ये आल्यापासून घरातील काही सदस्यांचे त्याच्याविषयीचे मत बरं नाही असे दिसून येत आहे.
4/ 7
काल त्यावर चर्चा झालीच आणि आजदेखीलचर्चा होताना दिसून येणार आहे. जय, स्नेहा, गायत्री आणि उत्कर्ष त्याच्याविषयी बोलताना दिसणार आहेत. यामध्ये उत्कर्ष आपल्या टीममध्ये चर्चा करताना आदिशला कॉमेडी म्हणत आहे.
5/ 7
तर यावेळी गायत्री दातार आदिशच्या चालण्याची ऍक्टिंग करताना दिसून येणार आहे.
6/ 7
तर दुसरीकडे स्नेहा आदिशबद्दल बोलताना म्हणते, '“मी त्याच्याकडे बघून बोलत नव्हते तर तो मला म्हणाला तू माझ्याकडे बघत पण नाहीये. असं आपल्या टीमला सांगते.
7/ 7
आता या सर्वांच्या मतांनंतर आदिशसाठी घरात राहणं किती कठीण होत जाणार? कि एकटा आदिश सर्वांवर भारी पडणार हे पाहून निश्चितचं औत्सुक्याचं ठरणार आहे.