बिग बॉसच्या घरातील कपल आता बाहेर पडलं आहे. रुचिरा जाधव नंतर रोहित शिंदेचाही घरातील प्रवास संपला आहे.
2/ 8
बिग बॉस मराठीच्या घरात मागच्या आठवड्यात चार challengers ची एंट्री झाली होती. त्यांच्या येण्याने खेळात धम्माल आणली आणि घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. दरम्यान
3/ 8
नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसत होता. मात्र बिग बॉसच्या चावडी मध्ये प्रेक्षकांना तसेच घरातील सदस्यांना खूप मोठा धक्का बसला जेव्हा महेश सरांनी विशाल आणि मीरा यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले.
4/ 8
विशाल आणि मीरा हे दोघे एकाच आठवड्यासाठी घरात होते.
5/ 8
या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले.
6/ 8
तर या आठवड्यात प्रसाद आणि रोहित मध्ये अक्षय, स्नेहलता, अपूर्वा, राखी, मीरा, अमृता देशमुख, यांनी रोहितला वजनदार ठरवले. तर किरण, अमृता धोंगडे यांनी प्रसादला वजनदार ठरवले.
7/ 8
आता पुढील भागात प्रेक्षक रोहितला मिस करतील हे निश्चित.
8/ 8
पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळणार आहेत.