'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन नुकताच पार पडला. दरवर्षी प्रमाणे यंदाही स्पर्धकांमध्ये वादविवाद, राडे, प्रेम आणि मैत्री पाहायला मिळाली.
2/ 8
बिग बॉसच्या या सीजनमध्ये अभिनेता-डान्सर विकास सावंतसुद्धा सहभागी झाला होता.
3/ 8
विकास सावंतने आपल्या धमाकेदार खेळीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं.शोमध्ये इतर स्पर्धकांप्रमाणे कधी विकासवर टीका झाली तर कधी त्याचं कौतुक झालं.
4/ 8
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरसुद्धा विकास चर्चेत आहे. हा शो संपताच विकासने एक मोठं स्वप्न उराशी बाळगलं आहे.
5/ 8
विकास सध्या ऑलिम्पिकची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे.
6/ 8
विकासला थाळी फेक स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा आहे. त्याला या माध्यमातून देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे.
7/ 8
ईटाइम्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विकासने सांगितलं की, 'मी एक ठेंगणा व्यक्ती आहे. माझी उंची कमी आहे. मात्र मला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच प्रतिनिधित्व करायचं आहे'.
8/ 8
बिग बॉसच्या घरात झालेल्या टास्कमध्ये मी माझी क्षमता दाखवली आहे. आता मला देशाचं प्रतिनिधित्व करुन जगाला माझी ताकत दाखवून द्यायची आहे'.