'बिग बॉस मराठी ३' च्या माध्यमातून अभिनेता जय दुधाणे आणि अभिनेत्री मीरा जग्गनाथ घराघरात पोहोचले होते. या दोघांची बिग बॉसच्या घरातील मैत्री सर्वांनाच माहिती आहे. घरातून बाहेर आल्यानंतरसुद्धा जय आणि मीरा चांगले मित्र आहेत. जय आणि मीरा काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आले होते. मीरा आणि जयची फ्रेश जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडली होती. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच जय आणि मीराला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच जय दुधाणेने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत आपली चिकणी जोडी पुन्हा येत असल्याचं सांगितलं आहे. जय आणि मीरा पुन्हा एकदा एका नव्या व्हिडीओ अल्बममध्ये दिसणार आहेत.