अभिनेत्री हिना पांचाळने नुकताच आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्री हिना पांचाळला 'साउथची मलायका अरोरा' असं संबोधल जातं. कारण हिनाचा चेहरा हुबेहूब बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळता जुळता आहे. हिना पांचाळ ही साउथची एक उत्तम डान्सर आहे. हिनाने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग केले आहेत. हिना अलीकडेच बिग बॉस मराठीच्या सीजन 2 मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. अभिनेत्री शिवानी सुर्वेनं हा शो सोडल्यानंतर तिच्या जागी वाईल्ड कार्ड म्हणून हिनाची एन्ट्री झाली होती. मराठी बिग बॉस मधील एक हॉट स्पर्धक अशी हिनाची ओळख होती. हिना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असते.