Bigg Boss फेम Karishma Tanna अडकली लग्नबेडीत, तुम्ही पाहिला का अभिनेत्रीचा वेडिंग LOOK
Karishma Tanna Varun Bangera Wedding: करिश्मा आणि वरुण आपल्या या वेडिंग लुकमध्ये फारच सुंदर दिसत होते
|
1/ 10
मनोरंजन सृष्टीतील लग्नसराई अजून सुरूच आहे. अंकिता लोखंडे, मौनी रॉय नंतर आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना नुकताच लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
2/ 10
करिश्मा तन्नाने आपला बॉयफ्रेंड आणि बिझनेसमॅन वरुण बंगेरासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांना ही आनंदाची माहिती दिली आहे.
3/ 10
करिश्मा तन्नाने आपल्या लग्न समारंभानंतर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती लग्नाच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
4/ 10
करिश्मा तन्नाने आपल्या लग्नामध्ये पारंपरिक लाल रंगाचा लेहेंगा निवडण्याऐवजी बेबी पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता.
5/ 10
या लेहेंग्यावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलं होतं. शिवाय अभिनेत्रीने मॅचिंग ज्वेलरीसुद्धा घातली होती.
6/ 10
तर दुसरीकडे वरुणने पारंपरिक गोल्डन कलरच्या शेरवानीला फाटा देत, पांढऱ्या रंगाची रॉयल शेरवानी निवडली होती.
7/ 10
करिश्मा आणि वरुण आपल्या या वेडिंग लुकमध्ये फारच सुंदर दिसत होते.
8/ 10
करिश्मा आणि वरुण यांनी आपल्या लग्नासाठी एका समुद्र किनाऱ्याजवळील ठिकाणाची निवड केली होती.
9/ 10
या दोघांच्या लग्ना आधीचे सर्व कार्यक्रमसुद्धा अशाच धुमधडाक्यात पार पडले होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
10/ 10
करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. त्यांनी अनेक दिवस एकेमकांना डेट करून गेल्यावर्षी साखरपुडा केला होता.