लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या बोल्ड लुक आणि स्टाइलसाठी ओळखली जाणारी रश्मी देसाई 'उतरन' या मालिकेतून 'तपस्या' च्या रूपात घराघरात पोहोचली होती. टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. तिच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आता तिचं खाजगी आयुष्यसुद्धा लपून राहिलेलं नाहीय.
बिग बॉस 13 नंतर मात्र या आई आणि मुलीच्या नात्यातील सर्व दुरावे दूर झाले होते. अभिनेत्रीने स्वतः आपल्या आईसोबतच्या बिघडत चाललेल्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रश्मी देसाईने तिच्या आईसोबतच्या नात्यावर खुलासा करत म्हटलं होतं- 'आई आणि माझ्या नात्यात खूप अडचणी होत्या'.