

बिग बॉस 9 ची स्पर्धक असणारी मंदाना करीमी तिच्या काही फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. मंदाना सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. लॉकडाऊनमध्ये तिने एक बोल्ड फोटो शेअर केला होता. तिने नुकताच एक सेमी न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामुळे तिला सोशल मीडियवर ट्रोल करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य-@mandanakarimi/Instagram)


मंदाना करीमीला सोशल मीडियावर अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्राम सोडले आहे. (फोटो सौजन्य-@mandanakarimi/Instagram)


ट्रोलर्सच्या कमेंट्सना कंटाळून तिने इन्स्टाग्रामवरील काही फोटो हटवले आहेत. याप्रकरणी एक व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले आहे की, 'मी एका सेक्सी मॉडेल व्यतिरिक्तही काहीतरी आहे. मी सोशल मीडियावर नेहमी इमानदार, ओपन आणि वास्तविक राहिली आहे.' (फोटो सौजन्य-@mandanakarimi/Instagram)


तिने पुढे म्हटले की, 'खूप राग येतो आहे. तुम्ही अश्लील कमेंट्स करून मला आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना त्रास दिला आहे.' (फोटो सौजन्य-@mandanakarimi/Instagram)


'या कमेंट्स वाचून मी आणि माझा मित्रपरिवार हादरलो आहोत. मला असे वाटते की, तुम्ही असा विचार करताय की तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे पण असे अजिबात नाही आहे. आता मला काही कारवाई करायला हवी.', असे देखील तिने म्हटले आहे. (फोटो सौजन्य-@mandanakarimi/Instagram)


मंदानाने तिच्या पोस्टमधून द्वेष न पसवण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य-@mandanakarimi/Instagram)