छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टीना दत्ता सध्या बिग बॉस 16 मध्ये झळकत आहे.
2/ 8
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता आज 27 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
3/ 8
टीना दत्ता अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला.
4/ 8
ती अनेक बंगाली टीव्ही शोमध्ये दिसली. यानंतर टीनाने बंगाली चित्रपटांमध्येही काम केले.
5/ 8
अभिनेत्रीने 2005 मध्ये 'परिणीता' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
6/ 8
2008 मध्ये आलेल्या 'उतरन' या मालिकेत 'इच्छा'च्या भूमिकेतून टीना दत्ताला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. हा शो सुपरहिट ठरला.
7/ 8
तुम्हाला माहितीये का टीनाला अभिनेत्री बनवायचं नव्हतं.
8/ 8
टीना दत्ता लहानपणापासूनच इंडस्ट्रीशी जोडली गेली असेल, पण मोठी झाल्यानंतर तिने एअर होस्टेसची तयारी सुरू केली. ती याचे प्रशिक्षणही घेत होती. मात्र, नशिबाला काही वेगळेच मंजूर केले होते आणि ती आता एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.