प्रसिद्ध गायक आणि बिग बॉस फेम अभिनेता राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुलाबी रंगाचा सुंदर लेहंगा आणि ऑफव्हाइट शेरवानी असा पोषाख त्यांनी लग्नासाठी परिधान केला होता. गुलाबी रंगाच्या लेहंग्यात दिशा अगदी सुंदर दिसत होती. गेले काही दिवस राहुल आणि दिशा यांच्या लग्नाची चर्चा होती. बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोझ केलं होतं. या प्रसिद्ध जोडीची मोठी फॅनफॉलोइंग आहे. दिशा आणि राहुल लग्नाआधी सुंदर मेहंदी सोहळा रंगला होता. हळदी समारंभही करण्यात आला. त्यासाठी दिशाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. राहुल आणि दिशाची धुमधडाक्यात हळद साजरी करण्यात आली.