Bhabhiji Ghar Par Hai Fame Saumya Tandon: 'भाभीजी घरपर है' या विनोदी मालिकेच्या माध्यमातून सौम्याने घराघरात अनिता भाभी आणि गोरी मेम बनून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
टीव्हीवरील एक ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री सौम्या टंडन होय. सौम्याला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय.
2/ 8
'भाभीजी घरपर है' या विनोदी मालिकेच्या माध्यमातून सौम्याने घराघरात अनिता भाभी आणि गोरी मेम बनून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
3/ 8
परंतु काही काळापूर्वी अभिनेत्रीने हा शो सोडला होता. सध्या अभिनेत्री पडद्यावरून दूर असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असते.
4/ 8
दरम्यान मूळची मध्य प्रदेश, भोपळची असणाऱ्या सौम्याने हॉटरफ्लाईला दिलेल्या एका मुलाखतीत उज्जैनमध्ये आपल्यासोबत घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केला आहे.
5/ 8
यावेळी बोलताना सौम्या म्हणाली, 'मी एकदा रात्री माझ्या घरी परतत होते आणि एका मुलाने माझी गाडी थांबवली आणि माझ्या भांगेत सिंदूर भरलं. या घटनेने मी भयानक घाबरले होते.
6/ 8
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, मी शाळेत असताना सायकलवरुन घरी येत होते एका मुलाने मला ओव्हरटेक केलं. मी रस्त्यावर पडले. माझ्या डोक्याला जबर दुखापत झाली होती.
7/ 8
मी वेदनेने तळमळत होते. मदतीसाठी ओरडत होते,परंतु त्यावेळी कोणीही मला मदत केलेली नव्हती.
8/ 8
सौम्या टंडनने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. तसेच शाहिद कपूर आणि करीना कपूरसोबत 'जब वी मेट'मध्ये काम केलं आहे. परंतु तिला खरी ओळख 'भाभीजी घरपर है' मालिकेमुळे मिळाली आहे.