टीव्ही मालिका 'बालिका वधू' मधून 'आनंदी' या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आता मोठी झाली आहे. बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेली अविका आता 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/ 10
अविकाचा जन्म 30 जून 1997 ला मुंबईत झाला होता. अभिनयाची आवड असल्याने ती बालपणापासूनच अभिनयक्षेत्रात सक्रिय होती.
3/ 10
वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षीच अविकाची बालिका वधू मालिकेसाठी निवड झाली होती. तर पहिल्याच मालिकेतून तिला तुफान प्रसिद्धी मिळाली होती.
4/ 10
अविकाला मिस युनिव्हर्स बनण्याची इच्छा होती. अविकाने मास कम्युनिकेशनमधून पदवी देखील संपादन केली आहे.
अविकाचं 18 वर्षांहून मोठ्या सहकलाकाराशी मनीष रायसिंघन (Manish Raisinghan) सोबत नातं असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण हे खोटं असल्याचं ती म्हणाली होती.
7/ 10
यावर अविका म्हणाली होती की , ती त्यांच्यामुळे खूप प्रभावीत झाली होती. पण अफवा पाहता त्यांनी एकमेकांशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे.
8/ 10
अविका गोर आणि मनीष रायसिंघनने 'ससुराल सिमर का' या प्रसिद्ध मालिकेत एकत्र काम केलं होतं.
9/ 10
अफवांमुळेही अविका कायमच चर्चेचा विषय ठरली होती. एका मुलाखतीत तिने म्हटलं होतं की अशीही अफवा आहे की, "माझ एक गुप्त ठेवलेलं मूल देखील आहे."
10/ 10
अविका सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचे 11 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. नेहमीच तिचे निरनिराळे फोटो ती शेअर करत असते.