'बाबा लवकर घरी या...',आजारी वडिलांसाठी अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट
अंकिताने एक फोटो शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
|
1/ 6
अंकिता लोखंडेचे वडील सध्या रुग्णालयात भर्ती आहेत. बालिका दिनाच्यानिमित्ताने अंकिताने आपल्या आई-वडिलांसोबत रुग्णालयात काढलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यावर अंकिताने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
2/ 6
तिने आपल्या पोस्टमध्ये बाबा लवकर बरे होऊन घरी परतावे अशी भावनिक साद घातली आहे.
3/ 6
शेअर केलेल्या फोटोमध्ये अंकिता आपल्या आई-बाबांसोबत दिसत आहे. त्या फोटोत अंकिताचे वडील स्मितहास्य करीत आहेत. या पोस्टमध्ये अंकिताने लिहिलं आहे की, मला कळत नाहीये मी माझ्या भावना कशा व्यक्त करू.
4/ 6
अंकिताने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली आहे
5/ 6
आई-बाबा तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे मी शब्दात सांगू शकत नाही. मी आज जे काही आहे, ते तुमच्यामुळे. तुम्ही दिलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. लवकर बरे होऊन घरी या बाबा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.
6/ 6
तस पाहता अंकिता आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार बोलत नाही, मात्र बालिकादिनाच्या निमित्ताने अभिनेत्रीने आपल्या पालकांप्रती असलेली भावना व्यक्त केली. आणि त्यांचे फोटो शेअर केले.