सुयश टिळक या अभिनेत्याची बायको कमालीची सुंदर दिसत आहे. आयुषी टिळकने काही नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. आयुषीसाठी चक्क सुयश फोटोग्राफर झाला असून त्यानेच बायकोचं हे कमाल फोटोशूट केलं आहे. सुयशला फोटोग्राफीची आवड असून तो अनेकदा स्वतः काढलेले फोटो शेअर करत असतो. सुयश आणि आयुषी हे कपलसुद्धा चाहत्यांमध्ये बरंच प्रसिद्ध आहे. आयुषी आणि सुयश आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची, त्यातल्या बऱ्याच फ़ंक्शनची खूप चर्चा झाली होती. तसंच त्यांच्या लग्नातल्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमसुद्धा दिलं होतं. आयुषी येत्या काळात 'तमाशा live’ सिनेमात दिसून येणार आहे.