अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या बरीच चर्चेत असते. आई कुठे काय करते मालिकेत झळकणारी ही अभिनेत्री सध्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सुंदर साडी, त्यावर शोभणारे दागिने, नाकात नथ असा तिने केलेला पारंपरिक लुक सध्या खूप प्रसिद्ध होत आहे. याचसोबत अश्विनीच्या हेअर स्टाईलचं पण खूप कौतुक होताना दिसत आहे. अश्विनीने या लुकमध्ये सुंदर रीलसुद्धा शूट केलं. यामध्ये ती फुलं तोडून त्यांचा वर्षाव स्वतःवर करताना दिसत आहे. तिच्या या निरागस आणि सुंदर अवताराचं खूप कौतुक होत आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ही अभिनेत्री आषाढी वारीमध्ये सुद्धा सहभागी झाल्याचं दिसून आलं होतं. तिने वारकऱ्यांसोबत वारीमध्ये खूप आनंद उपभोगला आणि ती विठ्ठलभक्तीत न्हाऊन गेल्याचं दिसून आलं होतं. अश्विनी सध्या तिच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकताना दिसत असते.