प्रेमाला वय नसतं; आशिष विद्यार्थीच नाही तर म्हातारपणी या 5 कलाकारांनीही केलंय लग्न
उम्र चाहे जो हो, लेकिन दिल तो बच्च है जी... हे गाणं नेहमीच आपल्याला नवी उर्जा देत आलं आहे. असं म्हणतात प्रेमात एखादा माणूस वेडा झाला तर तर प्रेम मिळवण्यासाठी तो कसलाच विचार करत नाही. मग ती जात असो धर्म, कुटुंब किंवा वय. आजी-आजोबा बनण्याच्या वयात अनेकांनी थेट स्वत:च्याच लग्नाचा घाट घातला. आज अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी वयाच्या पन्नाशीनंतर लग्नगाठ बांधली.
बॉलिवूड आणि साऊथ अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60व्या वर्षी दुसरं लग्न करून आपल्या नव्या संसाराला सुरूवात केली. आता 60व्या वर्षी लग्न करणारे आशिष विद्यार्थी पहिले अभिनेते नाहीत. याआधी देखील काही कलाकारांनी अशाप्रकारे लग्न केली आहेत.
2/ 7
अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी रुपाली बऊआबरोबर लग्न केलं. रुपालीच्या आधी आशिष यांचं राजोशी विद्यार्थीबरोबर लग्न झालं होतं. दोघांनी दोन मुलं देखील आहेत.
3/ 7
अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण यांनी 52 व्या वर्षी आपल्यापेक्षा लहान असलेल्या अंकिता कोंवर बरोबर लग्न केलं. अंकिता लग्नावेळी 26 वर्षांची होती. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
4/ 7
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील उतार वयात लग्न केलं. रिचर्ड यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहत असताना त्यांना मुलगी झाली. त्यांनी एकटीनं मुलीचा सांभाळ केला. त्यानंतर वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी विवेक मेहराबरोबर लग्न केलं.
5/ 7
मराठमोळी अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी देखील वयाच्या 60 व्या वर्षीच लग्न केलं. फेसबुक फ्रेंड असलेल्या मित्राबरोबर संसार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. लग्नाच्या 4 वर्षांनी त्यांनी लग्नाची माहिती दिली होती.
6/ 7
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी 17 वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर वयाच्या 54 व्या वर्षी लग्नगाठ बांधली. दोघांनी मागील वर्षी 25 मेला लग्न केलं. दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
7/ 7
तीन अपयशी लग्नानंतर कबीर बेदी यांनीही त्यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या ठीक एक दिवस आधी चौथ लग्न करून सगळ्यांना धक्का दिला होता. त्यांनी चौथी बायको ही मुलगी पूजा बेदीपेक्षा 3-4 वर्षांनी लहान आहे. कबीर आणि चौथी बायको परबीन यांच्या 30 वर्षांचं अंतर आहे.