पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री आशा नेगी सध्या तिच्या बोल्ड अवतारामुळे फारच चर्चेत आहे. पाहा तिचे हटके लुक्स. मालिकेतील सोज्वळ पूर्वी आता फारच बोल्ड झाली आहे. आशा काही दिवस छोट्या पडद्यापासून दूर असली तरीही ओटीटीवर ती सध्या सक्रिय आहे. आशाने अभिनयासोबतच अनेक शो होस्ट केले आहेत. अभिनेता रित्विक धंजानी सोबत तिची मालिकेतील केमिस्ट्री हिट ठरली होती. आशा बिग बॉस, नट बलिए, कॉमेडी नाइट्स अशा काही रियॅलिटी शो मध्येही दिसली होती. आशाचा सध्याचा बोल्ड लुक सध्या चांगलाच चर्चत आहे. आशाची नुकतीच 'ख्वाबोंके परिंदे' ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. आशा सोशल मीडियावर तिचे बोल्ड लुक शेअर करत असते. याआधी ती अभय २, लव्ह का पंगा या सीरिजमध्येही दिसली होती. आशाची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे.