Arjun Rampal Birthday : यशस्वी मॉडेल ते प्रेमळ पिता; वादग्रस्त आयुष्य जगूनही हा अभिनेता सतत असतो चर्चेत
अर्जुन रामपाल यशस्वी मॉडेल होता. 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तो सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्य आणि वाद यामुळे चर्चेत राहिला. 48 व्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही खास PHOTO


अर्जुन रामपाल सुरुवाताली मॉडेल म्हणून मग अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्थिरावला. 2001 ला त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्याच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त त्याचं करिअर आणि आयुष्य यांची एक झलक


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे बॉलीवूडचे अंमली पदार्थ तस्करीशी संबंध उघड झाल्यानं या प्रकरणी अलीकडेच अंमली पदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीनं अर्जुन रामपालच्या घरावरही धाड टाकली होती.


ड्रग्ज प्रकरणी NCB च्या चौकशीमुळे अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रॅब्रीएला दिमित्रेयेदस चर्चेत आले आहेत.


प्यार, इश्क और मोहोब्बत या चित्रपटापासून २००१ मध्ये त्याने आपली हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरू केली. राजीव राय याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.


2018 मध्ये पहिली पत्नी आणि मॉडेल मेहर जेसिका हिच्यापासून फारकत घेतली. त्यांनी 20 वर्ष संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला.


2019 मध्ये अधिकृतरित्या घटस्फोट घेतल्यानंतर त्याच वर्षी अर्जुन रामपालने आपली गर्लफ्रेंड ग्रॅब्रीएला दिमित्रेयेदस आई होणार असल्याची बातमी दिली.


जुलै २०१९ मध्ये त्यांचा मुलगा एरिक याचा जन्म झाला. अर्जुन रामपाल नेहमी आपल्या मुलांसमवेतचे फोटो शेअर करत असतो.


ग्रॅब्रीएलासोबतचे खास फोटोही तो सोशल मीडियावर टाकत असतो. त्याने ग्रॅब्रीएलासोबतचे बेबीमूनच्या काळातील रोमँटिक फोटोही शेअर केले होते.