

सध्या रात्रीस खेळ चाले मालिकेतली शेवंता गाजतेय. मालिकेत अण्णा आणि तिची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय. शेवंताचं काम करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरनं याआधीही मालिकांमध्ये काम केलंय. पण गाजतेय ती हीच भूमिका.


अपूर्वानं झी मराठीवरच आभास हा, एकापेक्षा एक जोडीचा मामला यात काम केलं होतं. झी युवावरच्या प्रेम हे मालिकेतही ती होती.


कलर्सवरच्या तू माझा सांगातीमध्येही अपूर्वाची भूमिका होती. तर स्टार प्रवाहवरच्या आराधनामध्येही अपूर्वा होती.


सिनेमांमध्ये इश्कवाला लव्ह आणि अगदी अलिकडचा अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरमध्येही ती होती. आलाय मोठा शहाणा, चोरीचा मामला ही नाटकंही तिनं केली.


अपूर्वा मुंबईत दादरमधलीच. किंग जाॅर्ज स्कूलमध्ये शिक्षण आणि नंतर रुपारेलमधून तिनं बीएमएसचा कोर्स केला. अभिनयात शिरण्याआधी अपूर्वा बँकेत काम करत होती आणि वडिलांच्या मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती.


अपूर्वा सध्या रात्रीस खेळ चाले 2 मालिका करतेय. पण ती रांचीला सब कुछ मंगल या सिनेमाचं शूटिंगही करतेय. एकाच वेळी सावंतवाडी आणि रांची अशी शूटिंगची कसरत करतेय.