अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लडमध्ये आहे. तेथिल अनेक फोटो ती शेअर करताना दिसत आहे. नुकतेच अनुष्काने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बाहेर फिरायला गेलेली दिसत आहे. अनुष्का तिथे व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. मुलगी वामिका सोबतही ती फिरताना दिसते. काही दिवसांपूर्वी ती अभिनेत्री आथिया शेट्टीसोबतही दिसली होती. आथियाने तिचे सुंदर फोचो क्लिक केले होते. त्यामुळे आथिया आणि अनुष्कामधील बॉन्डींग दिसून आलं होतं. अनुष्काने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. तर आपल्या कुटुंबासोबत ती निवांत वेळ घालवत आहे.