विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळं अधिक चर्चेत राहू लागली आहे. (Tripti Dimri/Instagram)
2/ 10
विराटसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. (Tripti Dimri/Instagram)
3/ 10
मात्र यावेळी अनुष्का तिच्या भावामुळं चर्चेत आहे. प्रसिद्धीपासून लांब राहणं पसंत करणारा अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं आहे. (Tripti Dimri/Instagram)
4/ 10
कर्णेश सध्या अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला डेट करत आहे. तिनं अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बुलबुल या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. (Tripti Dimri/Instagram)
5/ 10
बुलबुल या चित्रपटाची निर्मिती कर्णेश आणि अनुष्का या दोघांनी मिळून केली होती. यादरम्यान सेटवरच दोघांची मैत्री झाली. (Tripti Dimri/Instagram)
6/ 10
त्यानंतर अनेकदा दोघांना सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये पाहिलं गेलं. सोशल मीडियावर देखील एकत्र फोटो ते शेअर करतात. (Tripti Dimri/Instagram)
7/ 10
या फोटोंच्याच पार्श्वभूमीवर दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. (Tripti Dimri/Instagram)
8/ 10
कर्णेश आणि तृप्तीला त्यांच्या रिलेशनबद्दल अनेकदा विचारण्यात आलं परंतु त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. (Tripti Dimri/Instagram)
9/ 10
काही दिवसांपूर्वी अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या फोटोमध्ये अनुष्कासोबत कर्णेश आणि तृप्ती दिसत होते. (Tripti Dimri/Instagram)
10/ 10
तृप्तीने 2017 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अभिनेता श्रेयस तळपदेसोबत ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटात झळकली होती. (Tripti Dimri/Instagram)