भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारे जोडपे विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच आई वडील होणार आहेत.ऑगस्ट 2020 मध्ये आपण आई वडील होणार असल्याची घोषणा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केली होती.त्यानंतर तिची प्रचंड काळजी घेण्यात येत असून मागील काही दिवसांपासून ती आपल्या प्रेग्नन्सी काळातील विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.काळ्या रंगाच्या पोलका डॉट ड्रेसमध्ये तिने तिचे सुरुवातीचे काही फोटो काढले होते.