Khatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण
शोमधील सर्वात लहान स्पर्धक अनुष्का सेन हिला कोरोनाची लागण झाली.
|
1/ 6
कोरोनाचा प्रभाव शोवर पडू नये त्यामुळं रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी हा शो दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आला. परंतु कोरोनानं तिथे देखील या शोची पाठ सोडलेली नाही.
2/ 6
या शोमधील सर्वात लहान स्पर्धक अनुष्का सेन हिला कोरोनाची लागण झाली. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं तिच्यावर उपचार सुरु आहेत.
3/ 6
परंतु अनुष्काला कोरोना झाल्यामुळं खतरों के खिलाडी हा शो आता स्वत:च डेंजरझोनमध्ये अडकला आहे. अनुष्कासोबत आता इतर स्पर्धकांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
4/ 6
खरं तर अनुष्का शोमधून एलिमिनेट झाली अशी एक बातमी चर्चेत आली होती. पण ती एलिमिनेट झाली असली तरी देखील कोरोनामुळं आता तिला घरी सोडता येणार नाही.
5/ 6
शिवाय इतर सर्व स्पर्धक क्वानंटाईनमध्ये असल्यामुळं खतरों के खिलाडीचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. आता सर्व परिस्थिती सामान्य होईल तेव्हाच त्यांना उर्वरीत चित्रीकरण करावं लागेल.
6/ 6
या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये राहुल वैद्य, निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला, सौरभ राज जैन, आस्था गिल, सना मकबूल, मेहक चहल, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह हे कलाकार सहभागी झाले आहेत.