

2020 या वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी गुड न्यूज दिली. काही सेलिब्रिटींच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तर काही सेलिब्रिटींच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याची चाहूल लागणार आहे. विराट अनुष्कापासून ते अगदी करीना कपूर आणि सैफ अली खानपर्यंत अनेक कलाकार आईबाबा होणार आहेत.


विरुष्का – 2017 मध्ये अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विराट आणि अनुष्काचं लग्न झालं आणि 27 ऑगस्ट 2020 अनुष्काने तिच्या बेबी बम्पचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन तिच्याकडची गूड न्यूज जगजाहीर केली.


विराट शर्मा आणि अनुष्काचा स्टेडियममध्ये एकमेकांना खाणाखुणा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.


करीना कपूर आणि सैफ अली खान – खान कुटुंबात नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी करीनाने लॉकडाऊनमध्ये दिली. तैमुरला लहान भाऊ मिळणार असल्यामुळे तोदेखील खूश झाला. करीनाचं बाळ मार्च 2021 मध्ये जन्माला येणार आहे.


नोव्हेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आई झाली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.


अभिनेत्री अमृता आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी अनमोल यांनी 2016 मध्ये लग्न केलं. त्याआधी 7 वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. अमृता आणि अनमोलने सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. त्यांनी फक्त कुटुंबीयांबरोबर छोटेखानी लग्नसोहळा केला होता.


मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकरदेखील लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन तिने ही गुडन्यूज दिली आहे.


धनश्रीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम 23 नोव्हेंबर 2020 रोजी पार पडला. आता तिचे चाहते तिच्या बाळाच्या आगमनाची वाट पाहात आहेत.


30 जुलै 2020 रोजी भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं.


काही दिवसांनी हार्दिक बाबा होणार असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला. हार्दिकनं आपल्या बाळाचे नाव अगस्त्य ठेवले आहे. हार्दिक युएइमध्ये आयपीएल खेळत असला तरी मुलाचे फोटो तो शेअर करत असतो.


नताशाने बेबी बंपसह आपलं फोटोशूटही केलं होतं. या प्रत्येक फोटोंमध्ये हार्दिक तिच्यासह दिसला. हातात हात धरून रोमँटिक पोझ देत दोघांनीही फोटो काढले.