अनुप्रिया गोएंका ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Anupriya Goenka/Instagram)
2/ 10
अत्यंत लहान लहान भूमिका साकारत वेळप्रसंगी बॅकस्टेज काम करुन तिनं बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले. (Anupriya Goenka/Instagram)
3/ 10
अन् त्यानंतर संधी मिळताच तिनं ‘वॉर’, ‘ढिशूम’, ‘टायगर जिंदा है’, ‘पाठशाला’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या दर्जेदार अभिनयाचं प्रदर्शन केलं. (Anupriya Goenka/Instagram)
4/ 10
अनुप्रियाचा जन्म 29 मे 1987 रोजी कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. आज वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Anupriya Goenka/Instagram)
5/ 10
शाळेत असल्यापासून तिला अभिनयाची आवड होती पण फावल्या वेळेत ती वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायची. (Anupriya Goenka/Instagram)
6/ 10
2008 मध्ये अनुप्रिया मुंबई काम मिळवण्यासाठी मुंबईत आली. सुरुवातीला तिनं कॉलसेंटरमध्ये नोकरी केली. एका खासगी रुग्णालयात ती परिचारिका म्हणूनही काम करत होती. (Anupriya Goenka/Instagram)
7/ 10
शिवाय तिनं व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम केलं. त्यामध्ये ती यूपीए सरकारच्या भारत निर्माण मोहिमेचा भागही बनली होती. (Anupriya Goenka/Instagram)
8/ 10
2017 मध्ये टायगर जिंदा है या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात ती परिपूर्णा परिचारिकाची भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटात छोटी भूमिका होती मात्र तरीही तिनं ही भूमिका साकारली. (Anupriya Goenka/Instagram)
9/ 10
पुढे पद्मावत या चित्रपटात तिनं शाहिद कपूरच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारली होती. यामध्ये तिनं केलेल्या अभिनयाची सर्वांनीच स्तुती केली होती. (Anupriya Goenka/Instagram)
10/ 10
अनुप्रियाला खरी लोकप्रियता मिळाली ती आश्रम या वेब सीरिजमुळं. अन् आज ती बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Anupriya Goenka/Instagram)