Ankush Chaudhari : क्रिकेटचा देव अन् महाराष्ट्र शाहीर एकाच मंचावर; अंकुश चौधरीचा शिवतीर्थावर सन्मान
अंकुश चौधरी सध्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या अभिनेत्याला महत्वाचा सन्मान देऊन गौरवण्यात आलं आहे.
अंकुश चौधरी सध्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/ 8
शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
3/ 8
सगळीकडेच या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे.
4/ 8
या चित्रपटामधून केदार शिंदे यांची लेक सना चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केदार शिंदेंसाठी खूपच खास आहे.
5/ 8
अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
6/ 8
त्याआधी अंकुश चौधरीला नुकतंच मोठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सचिन तेंडुलकर सोबत अंकुशचा सन्मान करण्यात आला.
7/ 8
अंकुशने सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
8/ 8
'शिवतीर्थ ! “जाणता राजा” महानाट्य ! आमचा आगामी चित्रपट महाराष्ट्र शाहीर आणि सचिन तेंडुलकर !!! ' असं म्हणत अंकुशने ही पोस्ट शेअर केली आहे. चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.