अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबरला लग्नबंधनात (Ankita Lokhande and Vicky Jain wedding) अडकणार आहेत. लग्नापूर्वी दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे (Lokhande mehendi ceremony) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
|
1/ 11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा प्रियकर विकी जैनसोबत 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.
2/ 11
काल अंकिताची मेहंदी सेरेमनी झाली. विकी आणि अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/ 11
लग्नापूर्वी अंकिताचा मेहंदी सोहळा पार पडला ज्यामध्ये अभिनेत्रीने तिचा भावी पती विकी जैनसोबत जबरदस्त डान्स केला.
4/ 11
या सेलिब्रेशनमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी खुलेपणाने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले.
5/ 11
मेहंदी सोहळ्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन बॉलिवूड गाण्यांवर थिरकले, ज्याचे फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6/ 11
दोघांनीही मेहंदी सोहळ्यासाठी पिंक कलरची थीम ठेवली असल्याचे पाहायला मिळत आहे.
7/ 11
पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात अंकिता खूपच सुंदर दिसत आहे, तर विकीने त्याच रंगाची शेरवानी परिधान केली आहे. ज्यामध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहे.
8/ 11
वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये अंकिताचे रुप खुलले आहे.
9/ 11
अंकिताच्या हातांवर विकीच्या नावाची मेहंदी सजली आहे. अंकिताच्या हातावर मेहंदी काढणारी आर्टिस्ट दुसरी कुणी नसून वीणा नागदा होती.
10/ 11
लग्नाच्या विधी गेल्या आठवड्यात सुरू झाले आहेत.नुकतंच तिचा साखरपुडा पार पडला असून आज हळद आणि संगीत सेरेमनी आयोजित केली आहे.
11/ 11
अंकिता व विकी येत्या 14 डिसेंबरला लग्नबंधणार अडकणार आहेत. या लग्नात अंकिता व विकीचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय सहभागी होणार आहेत.