सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर पहिल्यांदाच अंकिता इतक्या आनंदात दिसली आहे अंकिताने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर गौरी पूजनाचे फोटो शेअऱ केले आहेत आईसोबत अंकिता मनोभावे महालक्ष्मीची पूजा करताना दिसत आहे सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताना मोठा धक्का बसला होता, आता ती त्यातून सावरत असल्याचे दिसत आहे आजचा दिवस देशभरात गौरीपूजनाचा दिन म्हणून साजरा केला जातो..यावेळी घरात मोठा थाटमाट असतो गौरी घरात बसवल्यानंतर त्यांचा साजश्रृंगार केला जातो..यादिवशी घरात अगदी दिवाळीसारखं वातावरण असतं गौरी पूजनासाठी अंकिताने छान मरुन रंगाची साडी नेसली आहे तर अंकिताच्या आईने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे बऱ्यात दिवसांनंतर अंकिताने नाकात नथ, हातात बांगड्या असा साजशृगांर केला आहे.. पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून अंकिताने प्रेक्षकांची मने जिंकली आहे, याशिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाई या चित्रपटातही तिने काम केले आहे. अंकिताने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत गणेशाच्या आगमनापूर्वी अंकिताने 2019 चे गणेश चतुर्थीचे फोटो शेअर केले होते गणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं...अंकिताही गणेशाची मनोभावे पूजा करताना दिसत आहे घरात बसवलेल्या गौरीला अंकिताने हिरव्या रंगाची साडी नेसवली आहे अंकिताने आपल्या इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओही शेअर केला आहे