छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेनं लग्नानंतर पहिल्यांदाच पतीसोबत मीडिया समोर पोज दिली. यावेळी अंकिता फारच सुंदर दिसत होती. अंकिता एकदम ट्रॅडिशनल अंदाजात मीडियासमोर आली होती. अंकिता लोखंडेनं निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. तर विकीनं फिकट निळ्या रानगाचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. या दोघांचे हे खास फोटो इन्स्टंट बॉलिवूडच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यावेळी फारच आनंदी दिसत होते. ते मीडियाला रोमँटिक पोज देत होते. अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकताच लग्नबंधनात बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली आहे. अंकिता लोखंडे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन हा एक उद्योगपती आहे. तो विलासपूरच्या एका कोळसा उद्योजकाचा मुलगा आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा वेडिंग लूक सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने आपल्या लग्नसाठी गोल्डन कलरचा सीक्वेन्स्ड लेहेंगा निवडला होता.