छोट्या पडद्यावरील यशानंतर बॉलिवूड चित्रपटात पाऊल ठेवणारी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने आपल्या सोशल मीडियावर तिचे वडील रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने पुन्हा एकदा वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. अंकिताने हे फोटो तिचे वडील रुग्णालयातून घरी आल्यानंतर शेअर केले आहेत. (Photo Credit- @lokhandeankita/Instagram)
अंकिता लोखेंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वडिलांसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अंकिताने वडील घरी आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये ती आपल्या वडिलांची कायम काळजी घेणार असल्याचे सांगितले आहे. (Photo Credit- @lokhandeankita/Instagram)