अंकिता लोखंडेला साड्या पाहून आली सुशांतबरोबर केलेल्या त्या मालिकेची आठवण, शेअर केली भावुक पोस्ट
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ला जुन्या साड्या पाहून तिची प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) ची आठवण झाली आहे. साड्यांसोबत तिने एक पोस्ट केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे.
|
1/ 7
गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी मालिका पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) आजही अनेकांची आवडती मालिका आहे. यामध्ये अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) 'अर्चना'चे पात्र साकारले होते. या शो संदर्भातील काही आठवणीने अंकिता भावुक झाली आहे.
2/ 7
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने नुकतेच तिच्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने या शो मध्ये नेसलेल्या साड्यांबाबत भाष्य केले आहे. (फोटो सौजन्य- @lokhandeankita/Instagram)
3/ 7
टेलिव्हिजच्या अर्चनाने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'मला साड्यांची नेहमी आवड आहे. अर्चनाबरोबर मी लुक्स, डिझाइन, वेगवेगळे पॅटर्न आणि साड्यांच्या विविध स्टाइल नेसल्या' (फोटो सौजन्य- @lokhandeankita/Instagram)
4/ 7
तिने असे म्हटले आहे की, मला आठवतंय की मला माझ्या भूमिकेसाठी कोलकात्याहून साडी खरेदी करायला आवडत असे. स्टायलिस्टबरोबर बसून मी नेहमी पवित्र रिश्ताच्या चाहत्यांसाठी काहीतरी सुंदर करण्याचा प्रयत्न करत असे (फोटो सौजन्य- @lokhandeankita/Instagram)
5/ 7
अंकिताने पुढे असं म्हटलं आहे की, खूप दिवसांनी हे पाहून नॉस्टालजिक वाटत आहे. त्यामुळे ही पोस्ट शेअर करत आहे. अंकिताने #archanadeshmukh #pavitrarishta #sareelover हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. (फोटो सौजन्य--@lokhandeankita/Instagram)
6/ 7
अंकिताच्या या पोस्टवर या मालिकेची निर्माती एकता कपूर हिने देखील कमेंट केली आहे. अंकिताचे जुने फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (फोटो सौजन्य--@lokhandeankita/Instagram)
7/ 7
अंकिता लोखंडेची 'पवित्र रिश्ता' ही पहिली मालिका होती. यामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर स्क्रीन शेअर केली होती. दीर्घकाळासाठी ही मालिका केल्यानंतर पुढे अनेक वर्ष दोघे रिलेशनशीपमध्ये देखील होते. (फोटो सौजन्य--@lokhandeankita/Instagram)