टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. आता दोघांनी याच वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दोघांच्या वेडिंग डेस्टिनेशनबद्दल अनेक बातम्या येत आहेत.