B'day Spl:लग्न झालेल्या अनिता हसनंदानीने सलमान खानला केलं होतं प्रपोज, तुम्हाला आठवतो का किस्सा?
Happy Birthday Anita Hassanandani: 'नागिन' फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
|
1/ 8
बॉलिवूड दबंग अर्थातच सलमान खान इंडस्ट्रीमधील मोस्ट बॅचलर आहे. त्याने आजपर्यंत लग्न केले नाही. पण अनेक मुली आणि अभिनेत्री त्याच्याशी लग्न करणाची स्वप्ने पाहतात.
2/ 8
असं म्हटलं जातं की, अभिनेत्याला अनेकदा अभिनेत्रींकडून ऑफरही आल्या आहेत. या यादीत टीव्ही आणि साऊथ अभिनेत्री अनिता हसनंदानीदेखील आहे. लग्न झाल्यानंतरही त्याने अभिनेत्याला लग्नासाठी प्रपोज केले होते?.
3/ 8
'नागिन' फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
4/ 8
14 एप्रिल 1981 मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला आहे. तिचे खरे नाव नताशा हसनंदानी आहे.
5/ 8
अभिनेत्रीने टीव्हीपासून साऊथ सिनेमापर्यंत काम केले आहे. ती सध्या एका मुलाची आई देखील आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की एकदा मॅरीड अनिताने सलमान खानला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया हा खास किस्सा.
6/ 8
अनिताने गेल्यावर्षी सलमान खानला प्रपोज केलं होतं. अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. याच व्हिडिओच्या माध्यमातून अनिताने भाईजानला लग्नासाठी प्रपोज केले होते.
7/ 8
व्हिडिओमध्ये अनिता हसनंदानी ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे’ असे म्हणताना दिसली होती. वास्तविक हा एक मजेशीर व्हिडीओ होता.
8/ 8
मात्र, व्हिडीओ शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने याबाबत पती रोहित रेड्डी याची माफीही मागितली होती. तिने लिहिलं होतं, 'सॉरी रोहित, मला या वर्षी प्रामाणिकपणे रील बनवायची होती'.