‘भारतात पुन्हा कशी येऊ?’ विदेशात अडकलेली अभिनेत्री आई-वडिलांसाठी व्याकूळ
तिचे आई-वडील भारतात राहतात. परंतु कोरोनामुळं पुढील काही काळ तिला कुटुंबीयांपासून दूरच राहावं लागणार आहे.
|
1/ 6
कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्यामुळं अमेरिकेनं देशाबाहेर जाणाऱ्या लोकांवर पुढील काही काळासाठी बंदी घातली आहे.
2/ 6
या बंदीमुळं बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर अमेरिकेतच अडकली आहे. तिचे आई-वडील भारतात राहतात. परंतु कोरोनामुळं पुढील काही काळ तिला कुटुंबीयांपासून दूरच राहावं लागणार आहे.
3/ 6
अमायरानं अलिकडेच कोरोना वॅक्सिन घेतलं व सोबतच इतरांनी देखील लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावं यासाठी जनजागृती केली.
4/ 6
सोशल मीडियाद्वारे ही जनजागृती करत असताना तिनं स्वत:च्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “कोरोनाच्या अंधकारातून बाहेर येण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग आहे. त्यामुळं लवकरात लवकर लस घ्या अन् कोरोनामुक्त व्हा.”
5/ 6
पुढे ती म्हणाली, “या कोरोनामुळं मी माझ्या आईवडिलांना भेटले नाहिये. भारतात परिस्थिती खूपच नाजूक आहे. त्यामुळं त्यांच्यापासून दूर राहणंच मी पसंत करतेय. पण आता मी त्यांच्या आठवणीनं व्याकूळ होतेय.”
6/ 6
राज्यात 15 जूनपर्यंत दोन कोटी 64 लाख 39 हजार 829 जणांचे लसीकरण झाले आहे. 45 पुढील लोकांचे लसीकरण अजूनही मोठ्या संख्येने होणे बाकी आहे.