

ज्यांना स्टंट, अक्शन अशा गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी खतरों के खिलाडी हा सर्वात आवडता रिअॅलिटी शो आहे. हा शो सुरू झाल्यापासून तो अनेकदा टीआरपी मीटरमध्ये वरच्या स्थानावरच असतो. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, खतरों के खिलाडी या शोच्या 10 व्या सीझनमध्ये अमृता खानविलकर झळकणार आहे.


स्वतः अमृताने ती या सीझनमध्ये भाग घेणार असल्याचं स्पष्ट केलं. नेहमीप्रमाणे यावर्षीही रोहित शेट्टी या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. लवकरच खतरों के खिलाडीची टीम ऑगस्ट महिन्यात बल्गेरियाला जाईल. तिथेच शोच्या सर्व भागांचं शूट होईल.


टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली की, ‘सध्य शोच्या टीमसोबत बोलणी सुरू असून अजून पर्यंत कोणतीच गोष्ट निश्चित करण्यात आलेली नाही.’ अमृता शिवाय ये है मोहोब्बतें मालिकेतील अभिनेता करण पटेलनेही या शोसाठी हो म्हटलं आहे.


गेले दोन सिझन या रिअलिटी शोला चांगला टीआरपीमुळे मेकर्सने 10 वा सीझन करण्याचा विचार केला. खतरों के खिलाडीचा आठवा सिझन अभिनेता शंतनू महेश्वरीने जिंकला तर नववा सिझन कोरिओग्राफर पुनीत पाठकने जिंकला होता.