

मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणाऱ्या अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यामध्ये झाला.


तिचं शालेय शिक्षण पुण्यामध्येच झालं. 2004 साली इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या कार्यक्रमातून तिने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. या शोमध्ये तिने तिसरा क्रमांक पटकवला.


अमृताच्या कुटुंबामध्ये तिचे आई वडील, बहीण असते. तिच्या बहिणीचं नाव आदिती खानविलकर आहे. हिमांशू मल्होत्राशी तिने लग्न केलं.


अमृता खानविलकर जशी उत्तम अभिनेत्री आहे तसाच ती सुंदर डान्सही करते. तिने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे.


नच बलिये, एकापेक्षा एक अशा शोमधून तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. तर कॉमेडी एक्स्प्रेस, बॉलिवूड टूनाईट या कार्यक्रमांचं तिने सूत्रसंचालन केलं.


गोलमाल, साडे माडे तीन, दोघात तिसरा आता सगळं विसरा, अर्जून, झकास, धूसर, सतरंगी रे, शाळा, आयना का बायना, बाजी, कट्यार काळजात घुसली यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय केला आहे.


राझी, फूंक, या हिंदी चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. खतरो कें खिलाडी या शोमध्येही ती सहभागी झाली होती.


अमृता खानविलकर एका मुलाखतीदरम्यान म्हणाली होती, ‘माधुरी दीक्षित माझ्यासाठी नेहमीच रोल मॉडेल असेल. 16 वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली होती.’


लहानपणीची आठवण सांगताना अमृता खानविलकर म्हणाली होती, ‘माझ्या कॉलनीत गणेशोत्सवात किंवा इतर कार्यक्रमांना मला माधुरी दीक्षितच्या गाण्यांवर डान्स करायला अतिशय आवडत असे ’


अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.