अमिताभ बच्चन यांची लेक नव्या नवेली नंदा कोणत्या न कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत असते. नव्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी तिची लोकप्रियता काही कमी नाही. स्टार किड असल्यामुळे ती कायमच प्रकाश झोतात असते. नुकतीच नव्या भोपाळला गेली आहे. भोपाळला पोहचताच तिने चाहत्यांसोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नव्या रस्त्यावर चाट-पापडीचा आनंद घेताना दिसत आहे. नव्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात तिचे केसही कापले. नव्याचा हा साधा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. नव्याच्या या साध्या राहणीमानाला पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. नव्याचे हे भोपाळ ट्रिपमधील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.