

संपूर्ण देशात दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूडमध्येही दिवाळीचा पहिला दिवस थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला. रविवारी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टी दिली (Amitabh Bachchan Diwali Party). या पार्टीत एकाहून एक स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत हेमा मालिनी (Hema Malini), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) पासून ते श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पर्यंत अनेक स्टार्सने हजेरी लावली होती. या पार्टीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनीही पाहुण्यांचं उत्साहाने स्वागत केलं.


बाबा शक्ती कपूरसोबत श्रद्धा कपूरने पार्टीत ग्रँड एण्ट्री घेतली. यावेळी तिने टायगर श्रॉफसोबत फोटोही काढले.


कियारा आडवाणीनेही बच्चन कुटुंबियांच्या पार्टीत पारंपरिक आणि पाश्चिमात्य फॅशनचा अनोखं कॉम्बिनेशन केलं होतं.


फ्लोरोसन्ट रंगाच्या साडीत काजोल फार मादक दिसत होती. या लुकमध्ये जेव्हा ती पार्टीत आली तेव्हा सर्व कॅमेरे आपसूक तिच्याकडे वळले.


चंकी पांडेचं कुटुंबही पारंपरिक वेशात दिसलं. यातही चंकीची मुलगी अनन्या पांडे फार मादक दिसत होती.