विवेक (Vivek Parmar) यांनी तीन वर्षांपासून पत्नी ग्वाल्हेरमध्ये काम करत असल्याने सांगितल्यानंतर अमिताभ बच्चन(Amitabh Bachhan) यांनी दोन शहरात काम करणाऱ्या अशा जोडप्यांना एकाच शहरात काम करण्याची संधी दिली पाहिजे, असं म्हटलं होतं. तसेच या मध्य प्रदेश पोलिसांनी परमार दाम्पत्याबद्दल विचार करावा असं आवाहनही केलं होतं. त्यांची पत्नी प्रीती सीकरवार त्यांच्या शहरात म्हणजेच ग्वाल्हेरमध्ये त्यांची पोस्टिंग करण्याची विनंती केली होती.
5 बच्चन यांनी शिफारस केल्यानंतर त्यांची बदली झाली. पण यामध्ये त्यांची बदली ग्वाल्हेरला करण्याऐवजी त्यांच्या पत्नीची बदली मंदसौरला करण्यात आली. यामुळे बच्चन (Amitabh Bachhan) यांच्या शिफारशीचा परिणाम उलटा झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारच्या या निर्णयाचा दोघांना फटका बसला असून त्यांच्या कुटुंबियांना देखील यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
विवेक (Vivek Parmar) यांनी आपली बदली ग्वाल्हेरमध्ये करण्याची मागणी केली होती. त्यांचे आईवडील ग्वाल्हेरमध्ये राहत असल्याने आईवडिलांकडे देखील लक्ष देता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी पत्नीच्या शहरामध्ये बदलीची मागणी केली होती. परंतु सरकारने त्यांच्यावर न्याय करण्याऐवजी अन्याय केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर पत्नीची बदली पुन्हा ग्वालियरला करण्याची विनंती देखील त्यांनी केली.