Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची संपत्ती किती कोटींची आहे माहीत आहे का? वारसदाराबाबतही घेतला आहे निर्णय
Happy Birthday Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांची बॉलिवूड कारकिर्दही 50 वर्षांची झाली आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. पाहा PHOTOS
अमिताभ बच्चन यांचा भारतासह विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळं त्यांचे अनेक चित्रपट हिट झालेले आहे. परंतु आता संपत्तीच्या बाबतीतही ते इतर कलाकारांपेक्षा मागे नाहीत, त्यांची एकूण संपत्ती ही 2,950 कोटी रूपयांची असल्याचं बोललं जात आहे.
2/ 8
caknowledge.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांचं उत्पन्न हे चित्रपट, टेलीविजन आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून येतं. त्यांची संपत्ती ही 2,950 कोटी रूपये असल्याचा खुलासा या रिपोर्टमधून करण्याता आला आहे.
3/ 8
अमिताभ बच्चन हे एका जाहिरातीसाठी जवळपास 5 ते 6 कोटी रूपयांची फी घेतात. कारण त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन हे सातत्याने आपला Tax वेळेवर भरतात.
4/ 8
अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबईत चार बंगले आहेत. त्यात 'प्रतीक्षा' या बंगल्यात ऐश्वर्या आणि अभिषेक राहतात तर 'जलसा' या बंगल्यात जया आणि अमिताभ बच्चन हे दोघं राहतात. याशिवाय त्यांच्याकडे 'जनक' आणि 'वत्सा' हे दोन बंगले आहेत.
5/ 8
अमिताभ यांना महागड्या गाड्यांचीही मोठी आवड आहे. त्यांच्याकडे 15 पेक्षा जास्त गाड्या आहेत. त्यात BMW, मर्सिडीज आणि रेंज रोवर यांसारख्या गाड्यांचाही समावेश आहे.
6/ 8
त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत रियल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. 2013 साली अमिताभ यांनी जस्ट डायलमध्ये 10 टक्क्यांची भागीदारी केली होती.
7/ 8
अमिताभ यांनी याआधीच घोषणा केलेली आहे की त्यांच्या संपत्तीत मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता या दोघांचाही समान हक्क असेल.
8/ 8
अमिताभ बच्चन यांना पेन वापरण्याचा फार छंद आहे. त्यांच्याकडे हजारोंच्या संख्येने पेनचं कलेक्शन आहे.