बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या बॉलिवूडमध्ये दिसत नाही. परंतु विविध मार्गांनी ती नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. 44 वर्षीय अभिनेत्री रुपेरी पडद्यावर दिसत नसली तरीदेखील आपल्या अदांनी ती नेहमीच चर्चेत असते. सध्या देखील अमिषा पटेल अशाच काही गोष्टींमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या सोशल मीडियावरून काही बोल्ड फोटो अपलोड केले असून यामध्ये निळ्या रंगाच्या बिकनीत ती खूपच सुंदर दिसत आहे. स्वीमसूटमध्ये तिने अतिशय मादक पोज दिल्या असून इंटरनेटवर हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. (Photo Credit- @ameeshapatel9/Instagram)