या अभिनेत्याकडे आहे 18 कोटींची व्हॅनिटी व्हॅन; पाहा आलिशान गाडीचे Inside Photos
सलमान खान आणि शाहरुख खानकडे देखील नाही अशी व्हॅनिटी व्हॅन; पाहा ही आलिशान गाडी आतून दिसते कशी?
|
1/ 7
अल्लू अर्जून (Allu Arjun) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो.
2/ 7
आपल्या स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अल्लूनं आजवर ‘येवडू’, ‘रेस गुर्रम’, ‘दुव्वावडा जगन्नाधाम’, ‘वेदम’, ‘जुलाई’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3/ 7
देशभरातील लाखो चाहते त्याला फॉलो करतात. या अफाट लोकप्रियतेमुळेच तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
4/ 7
कोट्यवधींची करणाऱ्या या अभिनेत्याला महागड्या वस्तुंची भरपूर हौस आहे.
5/ 7
महागड्या कार्स, बाईक्स, कपडे इतकंच नव्हे तर देशभरात विविध ठिकाणी त्यानं रिअल इस्टेटमध्ये देखील पैसे गुंतवले आहेत.
6/ 7
अशा या कोट्यधीश अभिनेत्याकडे तितकीच महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे.
7/ 7
एखाद्या आलिशान घराप्रमाणे दिसणाऱ्या या व्हॅनची किंमत जवळपास 18 कोटी रुपये आहे. इतकी महागडी व्हॅन कुठल्याच बॉलिवूड कलाकाराकडे सुद्धा नाही असं म्हटलं जातं.