Alia Bhatt Family Tree: फक्त इम्रान हाश्मीच नव्हे तर या कलाकारांशीसुद्धा आहे आलियाचं फॅमिली कनेक्शन
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत सध्या आपल्या लग्नाच्या चर्चांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. कपूर कुटुंबाविषयी आपण सर्वच जाणतो. परंतु आज आपण भट्ट कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत. अनेक कलाकारांचं भट्ट कुटुंबाशी फॅमिली कनेक्शन आहे
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत सध्या आपल्या लग्नाच्या चर्चांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. कपूर कुटुंबाविषयी आपण सर्वच जाणतो. परंतु आज आपण भट्ट कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत. अनेक कलाकारांचं भट्ट कुटुंबाशी फॅमिली कनेक्शन आहे.
2/ 9
आलिया भट्टच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं, तर ती महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी आहे.
3/ 9
सोनी राजदान या महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांना आलिया आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत.
4/ 9
आलिया आणि शाहीन यांच्यात फारच छान बॉन्डिंग आहे. शाहीनला अभिनय नव्हे तर लिखाणाची आवड आहे.. ती एक लेखिका आहे.
5/ 9
सोनी राजदानच्या आधी महेश भट्ट यांचे लग्न किरण भट्टसोबत झाले होते. त्यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले आहेत. यामुळे आलिया भट्टला आणखी दोन भावंडे आहेत.
6/ 9
इम्रान हाश्मी हा देखील आलिया भट्टचा नातेवाईक आहे. हे फारच कमी लोकांना माहीत आहे. इम्रान हा महेश भट्ट यांचा भाचा आहे. यामुळे तो नात्याने आलियाचा भाऊ आहे.
7/ 9
मोहित सुरी हा देखील आलिया भट्टचा भाऊ आहे. कारण इम्रान हाश्मीप्रमाणेच मोहित सुरीही महेश भट्ट यांचा भाचा आहे.
8/ 9
उदिता गोस्वामी ही मोहित सूरीची पत्नी आहे. यामुळे ती आलिया भट्टची वहिनी लागते.
9/ 9
महेश भट्ट यांचा भाऊ आणि चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे, जे नात्याने आलियाचे काका आहेत.