

काही दिवसांपूर्वीच आलियाने तिचा 26 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवस तिने रणबीर कपूर, महेश भट्ट बहिण पूजा आणि काही जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत साजरा केला.


एका वेबपोर्टलले प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आलियाने ड्रायव्हर सुनील आणि हेल्पर अनमोलला प्रत्येकी 50 लाख रुपये भेट म्हणून दिले. यामुळे ते मुंबईत घर विकत घेऊ शकतील यासाठी आलियाने ही मदत केली.


जेव्हा आलियाने २०१२ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हापासून हे दोघं तिच्या सोबत आहेत. आलिया या दोघांना तिच्या कुटुंबातील सदस्यच मानते. यामुळेच तिने अनमोल आणि सुनील यांना ५० लाख रुपये भेट म्हणून दिले.


सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुनील आणि अनमोल यांनी खार आणि जुहूमध्ये घर बुक केलं आहे. आलियाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती कलंक सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला.