

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. सतत चर्चेत असलेलं आलिया-रणबीरचं रिलेशन आजचं नव्हे तर फार वर्षांपूर्वीचं आहे असं समोर आलं आहे.


रणबीरने कपूरने आलियाबरोबरचं रिलेशन कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ही गोष्ट काही तो लपवू शकला नाही. कारण याबाबत आता खुद्द आलियानेच खुलासा केला आहे.


आलिया 11 वर्षांची असल्यापासूनच रणबीरच्या प्रेमात होती. त्याच्या फोटोकडे ती बघत बसायची, असं तिनेच एका मुलाखतीत सांगितलं.


आलिया भट्टने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, रणबीरबरोबर तिची पहिली ओळख ती 11 वर्षांची असताना झाली. ब्लॅक सिनेमाच्या ऑडिशनला आलियानं रणबीरला पाहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा रणबीरच तिचा क्रश होता.


त्यानंतर रणबीरने 'सावरियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. आलिया भट्टनं पुढे असंही सांगितली की, त्यावेळी मी रणबीरच्या फोटोकडे सतत पाहत राहायची.