

बॉलिवूड स्टार्स आपल्या अनोख्या स्वॅगसाठी ओळखले जातात. त्यांचे महागड्या गोष्टी खरेदी करण्याच्या आवडीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. महागड्या गोष्टी घेऊन त्या फ्लॉन्ट करायला प्रत्येकालाच आवडतं. यात आलिया भट्टही काही वेगळी नाही. नुकतंच तिला तिच्या सर्वात महागड्या बॅगसोबत एअरपोर्टवर फिरताना पाहण्यात आलं.


या बॅगेची किंमत जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हीही डोक्याला हात माराल हे नक्की. आलियाच्या या ब्रँडेड बॅगेची किंमत आहे तब्बल 1 लाख 61 हजार 43 रुपये.


आलिया तिच्या आईसोबत ‘सडक २’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ऊटीला जात होती. यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.


‘सडक २’ चं पहिलं शेड्यूल पूर्ण झालं असून दुसऱ्या शेड्यूलसाठी ती ऊटीला रवाना झाली. या सिनेमाव्यतिरिक्त आलिया संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ सिनेमात दिसणार आहे.


या सिनेमातून पहिल्यांदा सलमान खान आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमानंतर सलमान भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. त्यामुळे तिघांसाठीही हा सिनेमा फार खास असणार आहे यात काही शंका नाही.