ऐश्वर्य ठाकरे आणि अलाया फर्निचरवालाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण; पाहा PHOTO
ऐश्वर्य हा बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे, तर अलाया फर्निचरवाला ही पूजा बेदीची (Pooj Bedi) मुलगी आणि कबीर बेदींची(Kabir Bedi) नात आहे. अलायाने (Alaya Furniturewala) सैफ अली खानबरोबरच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं आहे.
अलाया फर्निचरवाला हिने गेल्या वर्षी जवानी जानेमन या सिनेमातून सैफ अली खानच्या मुलीचं काम करत बॉलिवूड डेब्यू केला होता.
2/ 6
हा फोटो आहे शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याचा. आपली आई स्मिता ठाकरे यांच्यासोबत तो एका रेस्टॉरंटमध्ये अलायाला भेटायला आला होता. अलाया आणि ऐश्वर्य ठाकरे यांच्या अफेअरची चर्चा सध्या मीडियात सुरू आहे.
3/ 6
अलायाने ऐश्वर्य ठाकरे, स्मिता ठाकरे यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवल्यानंतर बाहेर पडताना तिची ही छबी टिपली आहे.
4/ 6
रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना अलायानं काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसवर पांढऱ्या रंगाचा नॉटेड शर्ट घातला होता.
5/ 6
अलाया (Alaya) आणि ऐश्वर्य खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अलायाच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो पहिल्यांदा दिसला होता. त्यानंतर या दोघांचा फोटो समोर आला होता.
6/ 6
अलाया ही प्रोतिमा बेदी- कबीर बेदी यांची नात आणि पूजा बेदीची मुलगी आहे.