Fitness Alert! fit and fine दिसण्यासाठी Akshaya Deodhar अशी घेतेय मेहनत
Fitness alert: अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती.
|
1/ 10
पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर सध्या आपल्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. आपला फिटनेस राखण्यासाठी अभिनेत्री अतिशय मेहनत घेत आहे. तसेच सर्वांना हार्ड वर्क करण्याचा सल्लासुद्धा देत आहे.
2/ 10
अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अतिशय हार्ड एक्सरसाईज करताना दिसून येत आहे.
3/ 10
अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती विविध आणि कठीण योगा पोज देताना दिसून येत आहे. अक्षयाने आपले फोटो शेअर करत छान कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे.
4/ 10
अक्षया देवधरने कॅप्शन लिहीत म्हटलं आहे, 'तुम्ही अजूनही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नसाल. परंतु नक्कीच तुम्ही आज कालपेक्षा जास्त जवळ पोहोचलेले आहात'.
5/ 10
तसेच तिने पुढं लिहिलं आहे, 'त्यामुळे प्रयत्न करत राहा. आणि हार्ड वर्क करा'. अक्षयाच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
6/ 10
अक्षया सध्या आपल्या फिटनेससाठी जास्त सक्रिय झाली आहे. ती फार जास्त मेहनत घेताना दिसून येत आहे.
7/ 10
अक्षया देवधरने फोटो शेअर करत अनुज शेळकेचे आभार मानले आहेत. अर्थातच अभिनेत्री त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे.
8/ 10
अनुज शेळके हा एक फिटनेस कोच आहे. त्याने अनेक मराठी कलाकरांना आपला फिटनेस राखण्यासाठी मदत केली आहे.
9/ 10
अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. मालिकेतील रांगडा राणा आणि सुंदर, सुशिक्षित अंजलीबाई यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.
10/ 10
सध्या अक्षया देवधर झी मराठीवरील 'हे तर काहीच नाय' या विनोदी कार्यक्रमामध्ये सुंत्रसंचालन करत आहे.