Hardeek Akshaya Wedding: राणादाचा नादच खुळा! भर मांडवात थेट केलं पाठकबाईंना किस; फोटो पाहिलात का?
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील रील लाईफ जोडी अक्षया आणि हार्दिकचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. या लग्नात भर मांडवात हार्दिकने असं काही केलं कि पाहुणे पाहतच राहिले. पाहा त्यांच्या लग्नसोहळ्यातील गोड क्षण
गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दीक जोशीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. हे बहुप्रतिक्षित लग्न अखेर पार पडलं आहे.
2/ 8
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्याही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/ 8
अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. राणादा-पाठकबाईंनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
4/ 8
या खास क्षणी राणादाने भर मांडवात सगळ्यांसमोर पाठकबाईंना किस केलं. अक्षया-हार्दिकचा लग्नसोहळ्यातील हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
5/ 8
लग्नासाठी अक्षयाने खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर धोतरमध्ये हार्दिकही राजबिंडा दिसत होता.
6/ 8
त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हार्दिक-अक्षयाच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक होते.
7/ 8
या दोघांनी आज विधिवत लग्नगाठ बांधली आहे. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
8/ 8
आता राणादा-पाठकबाई विवाहबंधनात अडकल्यानंतर चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.