प्रेक्षकांची लाडकी जोडी राणा अंजली यांची लगीन घटिका समीप आली आहे. दोघांचा हळदी समारंभ आज पार पडला. पुण्यात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात दोघांना हळद लागली. हार्दीक आणि अक्षयानं लग्नाची हळद एन्जॉय केली. हार्दीक आणि अक्षया हळदीत दणकून नाचले. दृष्ट लागावी असे दोघांचे सुंदर फोटो समोर आलेत. दोघांनी हळदीसाठी व्हाइट कलरचे कपडे कॅरी घातले होते. तर व्हाराड्यांनी पिवळा रंगांचे कपडे घातले होते. हार्दीक आणि अक्षयाला उचलून घेत व्हराड्यांनी हळद चांगलीच नाचवली. नवरी बनलेली अक्षयाच्या ग्लो तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तुझ्यात जीव रंगलाची संपूर्ण टीम दोघांच्या लग्नासाठी पुण्यात दाखल झाली आहे.